Friday, February 24, 2017

क्षण जिंकण्याचा

"क्षण जिंकण्याचा"

आज प्रत्येकाला यश हवंय.. success हवाय पण यश सहजासहजी मिळत का?
कधी कधी तर आपण यशाच्या  जवळ आलेले असतो आणि कंटाळून पुन्हा मागे वळतो..
आणि यश हुकत.. तेव्हा खूप वाईट वाटत.. पण आपलं इप्सित साध्य करायचं असेल तर
हार मानून चालत नाही.. कारण मिळालेली संधी पुन्हा लवकर मिळत नाही...

माझा एक मित्र आहे 'समीर' नावाचा.. खूप हुशार पण परिस्थिती मुळे लाचार झालेला..
त्याला एक चांगला डॉक्टर व्हायचं होत.. त्यादृष्टीने त्याने प्रयत्न देखील केले
पण पैशाच्या अभावी पुढचं शिक्षण जमलं नाही.. नंतर नंतर तर त्याचा
स्वतःवरचा आत्मविश्वासच गळून पडला ..अगदीच काही नाही म्हणून त्याने
एका लोकल  डॉक्टरच्या हाताखाली प्रॅक्टिस सुरु केली.. सुरुवातीचा अनुभव
खुपच वाईट होता.. डॉक्टरची बोलणी.. पेशंट च्या तक्रारी त्याने तो हैराण
झाला.. शेवटी त्याने गावी जाऊन पडेल ते काम करण्याचा विचार केला...

गावी गेल्यावर त्याला कळलं गावच राहणीमान एवढं सोप्प नाही.. सगळ्याच
गोष्टींची वाणवा आहे.. साध्या साध्या उपचारासाठी लोकांना कोसो मैल जावं
लागतं.. गावी साधा दवाखाना नाही.. त्याने विचार केला आपण जर क्लिनिक टाकलं
तर आपल्याला पैसे पण मिळतील नाही सेवा पण घडेल.. आणि डॉक्टर बनायचं
स्वप्न पूर्ण होईल..

सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी त्याला खूप
प्रयत्न करावे लागले.. पण आता त्याला हरायच नव्हतं.. जेव्हा जेव्हा त्याच्या मनात
नाउमेदीचा विचार यायचा तेव्हा तो हाच विचार करायचा
"आपण कुठल्या कारणासाठी आता पर्यंत ठाम राहिलो.." आणि त्याला
नव्याने मार्ग मिळायचा.. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेकांचा विश्वास
संपादन केला..

आज तो गावामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखला जातो..
आज त्याच्यामुळे गावात एक सर्वसोयींयुक्त प्रशस्त दवाखाना आहे..
लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागृती निर्माण झाली आहे.

'समीर' सारखी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडत असतात..
आणि आपल्याला एक positive enargy देत असतात..

तसं तर आपल्या आयुष्यात अनेक खाचखळगे येतात... पण जेव्हा हरण्याची वेळ येते
तेव्हा आपण 'अजून ही कोणत्या गोष्टी साठी मागे हटलो नाही हे आठवावं..'
आत्मविश्वास वाढून एक नवी उमेद निर्माण होते..

" प्रत्येक क्षण हा जिंकण्याचा नसतो..
कधी कधी नवं काही शिकण्याचा ही असतो."

- शशांक कोंडविलकर







No comments:

Post a Comment